गोल्ड बॉंड|Gold Bond

मित्रांनो आजच्या ह्या Article मध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की सौरेन गोल्ड बाँड हा एक बाँड आहे ज्यामध्ये तुम्हाला सोन्याच्या वाढीचा फायदा मिळतो, त्यासोबत तुम्हाला काही टक्के व्याज देखील मिळतो. दर सहा महिन्यांनी इन्स्टॉलर्सच्या खात्यात व्याज जमा केले जाते. यामध्ये तुम्ही तुमचा टॅक्स हि वाचवू शकता. शेवटचे व्याज परिपक्वता कालावधीत मूळ रकमेसह दिले जाते. परिपक्वता कालावधी आठ वर्षांचा आहे. मात्र यामध्ये पाच, सहा, आणि सात वर्षांचा पर्यायही उपलब्ध आहे.

Pic credit: goodreturns.com

सोन्याच्या बाजारभावात घसरण झाल्यास भांडवल तोटा होण्याचा धोका असतो, त्यामुळे आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. कोणतीही व्यक्ती एका आर्थिक वर्षात कमीत कमी एक ग्रॅम आणि जास्तीत जास्त चार किलोग्रॅम चा बॉंड खरेदी करू शकतो आणि जर ट्रस्ट असेल तर तो 20 किलोग्रॅम पर्यंतचा बॉंड खरेदी करू शकतो. कोणतीही व्यक्ती वर्षामध्ये पाचशे ग्रॅमपर्यंतचे सोन्याचे बॉंड खरेदी करू शकते. बाँड मॅच्युरिटी कालावधी सरकारने आठ वर्षांसाठी ठेवला आहे. पण तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पाच वर्षांनी बाहेर पडू शकता.

मित्रांनो हि सोन्याबद्दल काही माहिती देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न होता माहिती महत्वाची वाटल्यास पुन्हा आवश्य भेट द्या.

Share to your friends

Leave a Comment