सोने खरेदी करताना बिल किती महत्वाचे आहे? जाणून घ्या येथे.

  • नमस्कार मित्रांनो मी आपले पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो आपली साईट goldmahiti.com वर. मित्रांनो आज या पोस्ट मध्ये आपण या विषयावर बोलणार आहोत कि सोने खरेदी करताना बिल घेणे किती आवश्यक आहे. आशा आहे कि तुम्ही पूर्ण पोस्ट वाचाल जेणे करून तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.
  • तर मित्रांनो माझ असे मत आहे कि आपण जेव्हा हि सोने खरेदी करतो. समजा आपण 1,00,000 रुपयाचे सोने खरेदी करतो तर त्यावर तीन टक्के GST आपल्याला लागते म्हणजे 3000 रुपये, तर 3000 जेव्हा आपण त्यांना देतो तर आपल्याला खात्री असते कि सोने आपण जे खरेदी करतोय ते बिल वर दिलेल्या सारख राहील म्हणजेच त्याची शुद्धता,वजन.
  • इतर गोष्टी अश्या घडतात मित्रांनो की नकरे नारायण आपले सोने हरवते किंवा चोरीला जाते. त्यामुळे या प्रकरणात काहीही झाले तेव्हा या GST इंव्हॉइस कॉपी खूप महत्वाच्या ठरतात कारण त्यांच्या आधार घेऊन आपण पोलीस कडे तक्रार करू शकतो. यानंतर, दागिने ही अशी गोष्ट आहे की आपण सोन्याचे दागिने दीर्घकाळ ठेवतो 5 वर्षे 10 वर्षे 15 वर्षे तर 5, 10, 15 वर्षांत जेव्हा आपण सोन्याचे दागिने विकत घेतलेले असता. आणि नंतर जेव्हा आपण त्या वस्तू बदली करतो तेव्हा आपल्याला वास्तविक कल्पना असावी की आपण जे सोने खरेदी केले आहे, त्यात आपल्याला किती शुद्धताचे सोने मिळाले आहे, ते हॉलमार्क आहे कि नाही हे त्या बिल वर सगळ दिलेल असत. कारण गॅरेन्टी नाही कि 15 वर्षांनंतर आपण ते सोन्याचे दागिने विकू तर सोनार तोच राहील अस. म्हणून GST बिल बनवायचं गरजेच आहे.
  • मान्य आहे काही सोनारांशी आपले जुने संबंध असतात आणि भावनेची जोड असते. आणि खरच काही सोनार हि इमानदार असता ते स्वतःहून आपणास GST बिल बनवायला सांगतात. कारण त्यांनीही वरून त्यांच्या व्यापाऱ्याकडून माल हा GST भरून आणलेला असतो तर ते ग्राहकांकडून रिफंड करून घेता. तर ह्या कंडीशन मध्ये GST च बिल घेणे आवश्यक ठरत अस माझ मत आहे. तरी पण तुम्हाला वाटते कि सोनार आमचा भरोसेमंद आहे तर ते तुम्ही विचार करू शकता.
  • आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही लोक याचा विचार करू शकता तुम्ही स्वतः GST भरत असाल म्हणजेच तुम्ही सरकारला टॅक्स भरता आहेत. आणि तरीही GST ची किंमत किती आहे? जर तुम्ही लाख रुपयांचे वस्तू घेत असाल तेव्हा तुम्हाला तीन हजार जीएसटी लागू करावा लागेल, तर माझ्या मते तुम्ही लोकांनी तिथे असलेला GST भरायला पाहिजे आणि GST बिल घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो आज साठी एवढच आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता, मी नक्कीच त्यावर माहिती पोस्ट च्या माध्यमाने आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेन.
  • त्यामुळे येणाऱ्या पोस्ट साठी आपल्या साईट चे नोटिफिकेशन on करा हि पोस्ट आवडल्यास आपल्या परिवारात व मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद.
Share to your friends

Leave a Comment