सोन्याचे हे काही रहस्य जाणून घ्या | Secrets about Gold

नमस्कार मित्रांनो पोस्ट चा फोटो बघून आणि शीर्षक वाचून तुम्हाला कळले असेलच की आम्ही यामध्ये तुम्हाला सोन्याशी संबंधित काही रहस्यमई गोष्टी सांगणार आहोत, आजची हि माहिती खूप मनोरंजक आहे त्यामुळे मला आशा आहे की तुम्ही पूर्ण पोस्ट वाचाल जेणेकरून तुम्हाला सोन्याबद्दल संपूर्ण माहिती होईल, तर चला सुरुवात करूया.

संपूर्ण जगभरात सोन्याचा सर्वाधिक वापर भारतात होतो, मात्र जगातील एकूण उत्पादनापैकी फक्त दोन टक्के सोन्याचे उत्पादन भारतात होते. भारतातील सोने म्हैसूर, कोलार, सिक्कीम आणि बिहारमधील सिंहभूम जिल्ह्यातील खाणींमधून मिळते.

आजपर्यंत सुमारे दोन लाख टन सोने सापडले आहे किंवा उपलब्ध आहे. आज आपण तासाभरात यापेक्षा जास्त स्टील बनवू शकतो. आजपर्यंत सापडलेले सर्व सोने एकत्र केले तर. त्याने ऑलिम्पिक आकाराचे तीनच जलतरण तलाव भरता येतील. सोने आणि तांबे हे असे धातू आहेत जे पाच हजार वर्षांपूर्वी सापडले होते. आणि वापरण्यात आलेला हा पहिला धातू होता. 24 कॅरेट शुद्ध सोने इतके मऊ आहे की ते हाताने देखील वाकवता येते.

आपण 10 ग्रॅम सोन्यापासून एक किलोमीटर लांब वायर सारखा तार देखील बनवू शकतो. सोनं फक्त काही देशातच सापडत नाही तर पृथ्वीच्या प्रत्येक महाद्वीप मध्ये हि मिळत आणि जगभरातील शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की सोने केवळ पृथ्वीवरच नाही तर बुध, मंगळ आणि शुक्रावरही आहे किंवा सापडू शकते. आजपर्यंत जे काही सोनं काढलं गेलं आहे, त्याचात अर्धाहून जास्त witwatersrand साऊथ आफ्रिकेतून काढण्यात आल आहे.

आशियातील अनेक देशांमध्ये, चहा आणि कॉफीमध्ये सोने मिसळून वापरले जाते. आपण इच्छित असल्यास, आपण सोने खाऊ हि शकतो आणि यामुळे आपल्याला आजारी पडण्याचा धोका कमी होतो. जगात असे काही लोक आहेत जे सोन्याला घाबरतात. ज्या आजाराला औरोफोबीया असे म्हणतात. आपल्या शरीरात जवळजवळ 0.002 मिलीग्राम सोने असते, जे बहुतेक आपल्या रक्तामध्ये असते. सोन्याचे दागिने घातल्याने आपली त्वचाची डेड सेल्स ज्या असता त्या देखील संपता.

युकेलीपटस नावाच एक झाड असत ज्याला आपण पांढऱ झाड असे देखील म्हणतो, त्याच्या पानांतूनही सोन्याचे कण आढळतात.  अंतराळवीरांचे हेल्मेट आणि स्पेसक्राफ्ट रोबोट बनवण्यासाठी देखील सोन्याचा वापर केला जातो. सोने सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करते आणि या उपकरणांना आतून थंड ठेवण्यास मदत करते. 

सोन्याचे मानवी शरीरात इंजेक्शन दिल्यास ते कर्करोगाशी लढण्यास मदत करते, केमोथेरपी अनेक कर्करोग रुग्णांना दिली जाते. 

जगातील 11 ते 12 टक्के सोने भारतीय महिलांकडे आहे. हे सोने अमेरिका, स्वित्झर्लंड, जर्मनी या देशांच्या एकूण सोन्याच्या साठ्यापेक्षा जास्त आहे.

तर मित्रांनो हि माहिती आवडल्यास आपल्या परिवारात आणि मित्रांसोबत शेअर करा आणि दररोज सोन्याचे दर हवे असल्यास बेल च्या चिन्ह दाबून subscribe करा आणि whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा धन्यवाद.

Share to your friends

Leave a Comment