सोन्याचे कॅरेट म्हणजे काय? व कोणत्या कॅरेट मध्ये असते किती शुद्धता जाणून घ्या येथे? 24,22,20,18 कॅरेट?

नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपली स्वतःची साईट goldmahiti.com वर

तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की जेव्हाही आपण सोन्याची खरेदी करायला जातो तेव्हा सोन्याचा कॅरेट सोन्याची किंमत, या सर्व गोष्टी आपल्याला खूप गोंधळात टाकत असतात, म्हणून आज आपण या पोस्ट मध्ये सोन्याच्या कॅरेटबद्दल बोलू.  कि हे कॅरेट नेमक काय असत आणि याचा सोन्याची शुद्धता शी कसा सम्बंध असतो.

तर सगळ्यात पहिला प्रश्न मित्रांनो जेव्हा आपण सोने खरेदी करायला जातो तो म्हणजे कोणता कॅरेट, सोन्याचा जो कॅरेट असतो मित्रांनो त्यात सोन्याची शुद्धता लपलेली असते म्हणून, पहिली गोष्ट घडते की आपण कोणत्या कॅरेटचे सोने खरेदी करावे आणि कोणत्या कॅरेटमध्ये किती शुद्धताचे सोने आहे.

तर आजच्या पोस्ट आम्ही तुम्हाला सविस्तर समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की सोन्याच्या कॅरेटने आपण त्याची शुद्धता कशी ओळखू शकतो?

कॅरेट म्हणजे काय?

मित्रांनो, सर्वात आधी हे जाणून घेणे आवश्यक आहे की सोन्यात कॅरेट, ते कुठून आले, जसे तुम्हा सर्वांना माहित असेलच. कॅरेटचे दोन प्रकार आहेत, जसे की हिऱ्यातील कॅरेटचा त्याच्या वजनाशी संबंध असतो आणि सोन्यामधील कॅरेटचा संबंध त्याची शुद्धताशी असतो.

तर हजारो वर्षांपूर्वी जर्मनांपैकी एक कॉईन होता? ज्याला मार्क म्हणले जायचे आणि त्या मार्क कॉईन च जे वजन होत ते होत 24 कॅरेट म्हणजेच 4.8 ग्राम, त्यामुळे जेव्हा जेव्हा कोणी सोने खरेदी करायला जायचे किंवा कोणी सोनार सोने विकतांना सोन्याबद्दल सांगायचे तेव्हा ते 24 कॅरेट सोने आहे असे म्हणून विक्री करायचे म्हणजे त्यांचा अस म्हणण्याच कारण होत कि तुम्ही आमच्यापासून जे सोने खरेदी करता आहेत ते त्या मार्ग कॉईन एवढ शुद्ध आहे. म्हणून मार्ग कॉईन शी हि गोष्ट जुडली आणि कॅरेट हि संकल्पना पुढे आली.

कोणत्या कॅरेट मध्ये असते किती शुद्धता?

कॅरेट चा एक सोपा फंडा आहे, समजा तुम्ही 22 कॅरेट चे सोने खरेदी करायला जाता आहेत. तर आपल्याला हे माहित असायला हव कि 1 कॅरेट ची शुद्धता हि किती असते? तर ती असते 4.166

म्हणजेच 24 कॅरेट सोने हे 100% शुद्ध असते बरोबर तर सोप गणित आहे तुम्ही 100 ला 24 ने भाग दिला तर ते येत 4.166 म्हणजेच एका कॅरेट ची शुद्धता झाली 4.166 ,  आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो 9 कॅरेट पर्यंत जे सोन असत ते सोन मानल जात नाही म्हणजे समजा तुमच्या कडे जर 9 कॅरेट असलेला एखादा कॉईन आहे तर तो कॉईन सोन्याचा आहे अस नाही मानला जाणार कारण 50% शुद्धता पेक्षा कमी असलेल सोन हे सोन नाही तर इतर धातूंमध्ये गणल जातं,

मग जर आता तुम्हाला समजा 22 कॅरेट सोन्याची खरेदी करायची आहे तर एक सोप गणित तुम्ही वापरू शकता

22 भागीले 24 मग जे काही येईल त्याला गुणीला 100

केल्यावर आपल्याला समजून जाईल कि 22 कॅरेट मध्ये किती शुद्धता असते ती असते 91.66% पण त्याला म्हणल जात 91.6 किंवा 92.

अश्याच प्रकारे जर 18 कॅरेट ची शुद्धता काढायची असेल तर त्यासाठी हि तेच सोप गणित

18 भागिले 24 मग जे काही येईल त्याला गुणिले 100 केल्यावर आपल्यासमोर येईल ती 18 कॅरेट ची शुद्धता मी एथे हि सांगतो कि 18 कॅरेट ची शुद्धता 75% येईल कारण ती असते तेवढी.

तुम्ही हे गणित नक्की वापरा.

आणि अश्याच प्रकारे तुम्ही बाकी इतर कॅरेट ची हि शुद्धता काढू शकता.

तर मित्रांनो हि अतिशय महत्वाची माहिती होती जी मी आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला , माहिती महत्वाची वाटल्यास आपल्या परिवारात व मित्रांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद.

Share to your friends

Leave a Comment