हॉलमार्क म्हणजे काय? | What is hallmark?

हेल्लो मित्रांनो मी आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तुमची स्वतःची site Goldmahiti.com वर मित्रांनो तुम्हा सर्वांना माहितच असेल की सोन्याचे दागिने खरेदी करण्याची परंपरा आपल्या भारतात शतकानुशतके चालत आलेली आहे.

पूर्वीच्या काळी अशी माणसं होती की त्यांचा एक सोनार फिक्स असायचा, ज्यांच्याकडे ते नेहमी आपले जुने सोने देऊन नवे दागिन्यांचा व्यवहार करत.

पण काही वेळानंतर टाईम बदलला आणि लोकांचा दृष्टीकोन हि बदलला म्हणजेच लोक डिझाइनला अधिक महत्त्व द्यायला लागले, नवीन डिझाइन्स सुरू झाल्या आणि दागिन्यांची दुकाने उघडल्या.

मग काही वेळेस अस हि व्हायचं कि आपण एखाद्या सोनाराकडून काही दागिने खरेदी केले आणि दुसर्या सोनाराकडे विक्री ला दिले मग व्हायचं अस कि त्या दागिन्यांची दि काही शुद्धता आहे ती त्या सोनाराने सांगितल्या पेक्षा कमी भरायची.

त्यामुळे दागिन्यांवर हॉलमार्कची गरज भासू लागली. आता हा हॉलमार्क काय आहे? या पोस्ट मध्ये आपण ते पूर्ण तपशीलवार समजून घेण्याचा प्रयत्न करू.

सर्व प्रथम कि हॉलमार्क ची सुरुवात कशी व कुठून झाली. असे मानले जाते की हॉलमार्क 15शे वर्षांपूर्वी सुरू झाला होता, परंतु जर आपण त्याच्या पुराव्याबद्दल बोललो तर आपल्याला पुरावे मिळाले आहेत. advard i नावाच्या एका व्यक्तीच्या पुतळ्यावर ते कसे कि त्या पुतळ्यावर लिहिले होते कि कोणी हि व्यक्ती किंवा मजूर येथून एकही सोन्याचा किंवा चांदीचा तुकडा उचलून नेऊ शकत नाही, जो पर्यंत त्या वर leopard चा एक चिन्ह नही राहत. leopard म्हणजे एक प्राणी ज्याला आपण बिबट्या नावाने ओळखतो.

म्हणजेच हॉलमार्क हि काही नवीन गोष्ट नाही आहे हि वर्षानुवर्षे ते चालत आलेली आहे. आणि आपल्याला विविध देशांत विविध प्रकारचे हॉलमार्क बघायला मिळतात. सर्वप्रथम ची जे हॉलमार्कचे महत्त्व काय आहे? हॉलमार्कचे सर्वात मोठे महत्त्व म्हणजे कोणत्याही दागिन्यांमधील भेसळ.तुम्ही जे करता त्यात भेसळीचे प्रतिध्वनी येत नाहीत. पण ती गोष्ट हॉलमार्क आहे. तर तुम्ही ती गोष्ट खरेदी करू शकता कारण की तिथल्या सरकारने किंवा प्राधिकरण म्हणजे सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवनार्याने तो अधिकार दिला आहे. कि तुम्ही हि वस्तू खरेदी करू शकता. तर आपल्या भारतात हॉलमार्क कोन लावत ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड जे आहे त्यांनी सन 2000 पासून दागिन्यांचे हॉलमार्किंग करण्याची सुरुवात केली.

मग दागिन्यांवर हॉलमार्क करण्याची सुरुवात झाली. त्यांनी काही काही जिल्ह्यात काही केंद्रे बनवली, त्या केंद्रांवर जाऊन सर्व सोनार त्यांच्या दागिन्यांचे हॉलमार्क करून घेऊ शकतात. आता असे काही सोनार आहेत जे सूचीबद्ध म्हणजे listed नाहीत, परंतु हे 1 एप्रिल 2023 नंतर सर्व सोनारांना त्यांचे दागिन्यांवर हॉलमार्क टाकल्याशिवाय त्यांचे दागिने विकू शकणार नाहीत.

हॉलमार्कमध्ये काही चिन्हे आहेत, पहिले चिन्ह ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड चा त्रिकोण चिन्ह आहे.

त्यानंतर दुसर चिन्ह आहे त्याची शुद्धता, तुम्ही खरेदी केलेल्या कोणत्याही दागिन्याप्रमाणे, ते किती कॅरेट मध्ये आहे आणि त्याची शुद्धता किती आहे. जर 22 कॅरेटचे दागिने आहेत मग त्याची शुद्धता आहे 91. 6%, तर त्या दागिन्यावर स्पष्ट पणे 91.6% असा शिक्का असतो.

त्यानंतर सगळ्यात महत्वाच म्हणजे ( HUID = हॉलमार्क युनिक आयडेन्टीफिकेशन डीजीट ) कोड

त्यानंतर हॉलमार्क सेंटरचा लोगो काही मर्यादित हॉलमार्क सेंटर आहेत आपल्या देशात तर त्यांचा प्र्तेकाचा वेग वेगळा लोगो असतो तो हि तुम्हाला बघायला मिळतो.

त्यानंतर सोनाराचा दुकानाचा लोगो हि तुम्हाला बघायला मिळतो.

तर मित्रांनो वरील फोटो मध्ये तुम्ही पाहू शकता कि हेच ते काही चिन्ह आहेत जे आपल्या हॉलमार्क च्या दागिन्यांवर असायला हवेत.

मित्रानो हि माहिती महत्वाची वाटली असल्यास आपल्या परिवारात व मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आपणास दररोजचे सोन्याचे भाव आपल्या मोबाईल वर हवे असल्यास आमच्या whatsapp गुप ला जॉईन व्हा धन्यवाद.

Share to your friends

Leave a Comment