चांदी परिधान करण्याचे अनोखे फायदे. जाणुन घ्या येथे. | Benefits of Wearing Silver.

मित्रांनो, आपण कधी विचार केला आहे का की आपण माणसं इतके सोने-चांदी का परिधान करतो ? सोन्या-चांदीची दागिने जर कोणत्याही देशात सर्वात जास्त परिधान केली जातात, तर तो आपला भारत देश आहे, म्हणून आजच्या पोस्ट आपण इतके सोने-चांदी का घालतो या वर चर्चा करणार आहोत.  पान तारी पान पन्नासआपल्या या Site वर जवळपास आठ ते दहा पोस्ट आपन सोन्याशी संदर्भात टाकले आहेत. परंतु आज आपण बेसिक चांदी ची माहिती बघणार आहोत.  तर नमस्कार मित्रांनो माझे मी तुमचे मनापासून स्वागत करतो. आपल्या स्वत: च्या Site Goldmahiti.com वर.

मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच आहे की आपण जे काही उघड्या डोळ्यांनी पाहतो, त्या सर्व गोष्टी म्हणजे एक ऊर्जा असते, तर त्यात दोन प्रकारच्या उर्जा असतात, एक डेड उर्जा आणि एक जीवंत ऊर्जा, जीवंत उर्जा म्हणजे जिला आपन उघड्या डोळ्यांनी बघू शकतो, जी चालू फिरू शकते ती जीवंत उर्जा. आणि जी वस्तु ह्या गोष्टी करू शकत नाही ती झाली डेड उर्जा. मग हे जेवढे पण धातू आहेत सोने,चांदी,तांबे,पित्तळ हे सर्व डेड उर्जा मध्ये येतात. सांगण्याचा अर्थ असा आहे कि ते फक्त धातू जरी असले पण त्यांना किंवा त्यांचा रंग बघून आपल्या मनात काही भावना निर्माण होतात म्हणून त्यांना डेड  ( मृत ) उर्जा देखील म्हणतात.

आता जर आपण चांदीबद्दल बोललो तर चांदीला इतकं महत्त्व का दिलं जातं, मित्रांनो, आपल्या भारतात कोणत्याही धातूला दोन प्रकारचे महत्त्व आहे, एक अध्यात्मिक आणि दुसरे वैज्ञानिक, वैज्ञानिक म्हणजे जे विज्ञानाने सिद्ध केले आहे.

चांदीचे आध्यात्मिक महत्त्व पहा, असे म्हटले जाते की ते भगवान शंकराच्या डोळ्यांहून बाहेर पडलेला एक धातू असावा. तसेच चांदी हा शुक्र आणि चंद्रमाताचेही हे म्हणजे हे जे जे दोन ग्रह आहेत ते चांदी परिधान केल्याने शांत असतात. एका जोतिष ने अस हि सांगितल होत कि चांदी धारण केल्याने तुमचा राग देखील शांत होतो.त्या नंतर आपल्या काही वेद पुराण आणि ग्रंथांमध्ये हि याचा उल्लेख केला गेला आहे.

आता बघू वैद्यानिक कारण,चांदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल तत्व आहेत जसे आपण म्हणतो कि हळद मध्ये हि अँटी-बॅक्टेरियल  गुण असता तसेच चांदीमध्ये हि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, आणि चांदी धारण केल्याने तुमचे रक्ताभिसरण सुरळीत राहते आणि शरीरातील रक्त देखील थंड राहते. यासाठी तुम्ही अनेकदा ऐकले असेल की ज्यांना राग येतो त्यांनी चांदी घालावी.

आता हे बघू कि आपल्या भारत देशात लोक एवढी चांदी का परिधान करता तर यामागच कारण अस आहे कि चांदी चे भाव हे आधी पासून परवडणारे आहेत अर्थात मध्यमवर्गीय लोकांसाठी किंवा गरीबातील गरीब लोकांसाठी ते परवडणारे आणि उपलब्ध झाले आहे. आता हेच कारण आहे की आपल्या देशांत काही राज्यांमध्ये तुम्हाला इतकी चांदी दिसत असते राजस्थानमध्ये स्त्रिया जाड चांदीच्या बांगड्या व इतर दागिने घालतात.

चांदीचे सगळ्यात मोठा वैद्यानिक कारण बघायला गेलो तर ते अस हि आहे कि सकाळी अंघोळ करायच्या वेळेस निश्चित नाही कि सगळे लोक आपले चांदीचे दागिने शरीरावरून काढून अंघोळ करता अस काही नाही. काही लोक आहेत. जे दागिने काढून ठेवत नाहीत.  मग त्याने काय होत कि आपण रोज जेव्हा अंघोळ करताना वरून जेव्हा पाणी अंगावर टाकतो तेव्हा चांदीचे काही बारीक कण एकदम नाही सारखे कण तुटून आपल्या शरीरावरून होऊन जातात मग चांदी अँटी-बॅक्टेरियल असल्यामुळे एक चांगला प्रभाव सोडत असते.

 

 

Share to your friends

Leave a Comment