EMI (हफ्त्या) ने सोने खरेदि?| buy gold on EMI?

नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत करतो. तुमची स्वतः ची site Goldmahiti.com वर 

तर या पोस्ट मध्ये तुम्ही EMI वर सोने खरेदी करू शकतो का ? असे शीर्षक पाहिले असेलच. तर या विषयावर आपण चर्चा करणार आहोत.

मी अनेकांना असे म्हणताना ऐकले पाहिले की काय आपण खरच EMI वर सोने खरेदी करू शकतो की नाही.

आपण ते तांत्रिकदृष्ट्या तर करू शकत नाही, परंतु त्याच्या काही त्रुटी आहेत, ज्या मी तुम्हाला येथे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.या पोस्ट मध्ये आशा आहे की तुम्हाला हि माहिती आवडेल आणि मी तुम्हाला सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे समजून देण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी तुम्हाला हि पोस्ट शेवटपर्यंत पूर्ण वाचावी लागेल.

तर पहिला प्रश्न असा आहे की आपण सोने किंवा सोन्याचे दागिने कर्जावर (Loan) वर घेऊ शकतो? तर त्यात एक मार्ग असा आहे कि ज्यामध्ये आपण सोनारकडे जातो आणि काही EMI मध्ये (हप्त्यांमध्ये) पैसे त्यांना देतो. नंतर एक वर्ष पूर्ण झाल्यावर, किंवा18 महिने पूर्ण झाल्यावर, किंवा काही कालावधीनंतर.सोनार आपल्याला आपण खरेदी केलेलं सोन किंवा सोन्याचे दागिने प्रो वाइड करतो पण.

प्रश्न हा नाही की आपण आधी पैसे जमा करावेत, मग सोन घ्यायचे तर प्रश्न असा आहे की आपण क्रेडिट कार्ड, बजाज फायनान्स कार्ड, किंवा सोने ताबडतोब विकत घेऊ शकतो का, तर ह्याच सगळ्या गोष्टींना मी इथे आपणास समजवण्याचा प्रयत्न करतोय.

पहिला प्रश्न असा आहे की सोने जे आहे ते आपल्याला लोन वर का मिळत नाही?

मी माझ्या मागील पोस्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कर्जावर सोने किंवा दागिने का मिळत नाहीत? कारण सोन किंवा सोन्याचे दागिने जे आहेत ते प्रत्यक्षात 1 प्रकारचा पैसाच आहेत.

तुम्हाला पैशावर कर्ज मिळू शकत नाही कारण जे खर चलन (Currency) जी आहे ते म्हणजे सोने,आणि चांदीच आहे.

जर तुम्ही आपली ह्या मुद्यावर असलेली मागची पोस्ट वाचली नसेल तर मी तुम्हाला त्याची लिंक इथे देतो जेणेकरून तुम्ही ते पाहू शकाल.

हे वाचा: खरा पैसा

तर काय आपण क्रेडिट कार्ड वर लोन घेऊन आणि क्रेडिट कार्ड EMI करून आपण दागिने खरेदी करू शकतो का?

तर त्याचे तंत्रीकरीत्या उत्तर आहे नाही. का?

कारण समजा आपण एका सोनाराकडे गेलो आणि त्याला म्हणलेकि हे घे बाबा माझे क्रेडीटकार्ड आणि ह्याच्यावर मला EMI करून दे तर त्या वर सोनार च एकच उत्तर राहील कि बाबा सोन्यावर EMI होत नाही.

दुसरी म्हणजे जर तुमच्या क्रेडिट कार्ड ची लिमिट ₹ 1,00,000 असेल.

समजा तुमची क्रेडिट कार्ड मर्यादा ₹1,00,000 असल्यास, तुम्ही ₹1,00,000 स्वाइप केले आहेत. आणि ते दागिने घरी हि घेतले नंतर काय करणार? तुम्ही कस्टमर केअरला कॉल कराल आणि त्यांना विचारणार कि सर कायह्याच्यावर EMI होऊ शकते?

तर त्याचं हि ह्याच्यावर हेच उत्तर राहील कि, साहेब तुम्ही हि खरेदी जी केली आहे ती सोनाराच्या दुकानावरून केली आहे तर ह्यावर आम्ही EMI नाही करून देऊ शकत.

तर आपण इथे हे सोडूनच देऊ कि EMI ने सोने खरेदी करता येईल.

आणखी एक गोष्ट म्हणजे जर आपण बजाज फिनसर्व्ह कार्डने दागिने खरेदी करू शकतो? तर यावर मी काही रिसर्च केली आहे. कि बजाज कार्ड कुठल्याही सोनार कडे चालत नाही.

तिसरे म्हणजे, आपण लोन घेऊन दागिने खरेदी करू शकतो? जस कि पर्सनल लोन झाल तर आपण ते करू शकतो, परंतु आपल्याला कदाचित माहित नसेल की 17%, 18%, 19% टक्के ही पर्सनल लोनची टक्केवारी आहे.

तर 15 ते 20 टक्के पर्यंत व्याजदर आणि 12 ते 15 टक्के पर्यंत असलेली दागिन्यांची मजुरी म्हणजे जवळपास 30 ते 35 टक्केपर्यंत तुम्ही पकडून चला कि तुम्हाला द्यावे लागतील सोन्याचे दागिने घ्यायला.

त्यामुळे, माझ्या मते, त्यासाठी 40% पर्यंत दागिने खरेदी करणे योग्य नाही.

तर मित्रांनो हि छोटीशी माहिती आपणास महत्वाची वाटल्यास आपल्या site ची नोटिफिकेशन Allow करा आणि काही प्रश्न असल्याल कमेंट मध्ये विचारा धन्यवाद.

आणि सोन्याशी संभर्दीत माहिती साठी आपल्या whatsapp ग्रुप ला Add व्हा.

Share to your friends

Leave a Comment