काय आहे HUID सरकारचा नवीन नियम जाणून घ्या इथे.

नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपली साईट goldmahiti.com वर मित्रांनो आजची हि पोस्ट या विषयावर राहणार आहे कि 1 एप्रिल 2023 पासून सरकारने HUID जे आहे ते आपल्या देशाच्या 256 जिल्ह्यांमध्ये अनिवार्य केलेले आहे. तर हे HUID काय आहे ज्यामुळे सोनारांना त्याची खूप चिंता होत आहे आणि त्यामुळे तुम्हाला काय फरक पडेल? ह्या सगळ्या प्रश्नांबद्दल आपण ह्या पोस्ट मध्ये बोलणार आहोत

तर बघा मित्रांनो याआधी 15 जून 2021 पासून जेव्हा सरकारने हॉलमार्क चे दागिने पूर्ण भारतभरात अनिवार्य केले होते तेव्हा सोनार एवढे चिंतेत नव्होते.त्याचं हि अस मत होत कि हॉलमार्क चेच दागिने हे विकले गेले पाहिजे. मात्र यासोबतच त्यावर सरकारने एक संकल्पना लागू केली आहे. जी म्हणजे HUID , तर आता हे HUID काय आहे? बघा मित्रांन्नो पहिल्या हॉलमार्कमध्ये चार चिन्हे असायचे, त्यापैकी पाहिलं चिन्ह होत BIS च त्रिकोणी चिन्ह, त्यानंतर त्या दागिन्यांची शुद्धता हि लिहलेली असते, त्यानंतर हॉलमार्क सेंटरचा लोगो आणि सोनाराचा दुकानाचा लोगो.

https://goldmahiti.com/

हॉलमार्क आणि HUID म्हणजे काय? | What is hallmark and HUID?

 

पण आता सरकारने HUID चे 6 क्रमांक जोडण्याची योजना सरकारने आनली आहे. आता हे HUID चा फुलफोर्म ( हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर ) असतो, आता यामध्ये सरकार प्रत्येक दागिन्याला एक विशिष्ट 6 अंकी कोड देत असता, म्हणजेच प्रत्येक दागिन्याला एक युनिक कोड असतो. आता याची अंमलबजावणी कशी होते? तर सरकारने हे 256 जिल्ह्यांमध्ये एक हॉलमार्क सेंटर नेमलेले आहेत. तिहे जेव्हा हे दागिने हॉलमार्क व्हायला जातात तेव्हाच ते सेंटर वाले त्यांचा पोर्टल वरून एक 6 अंकी युनिक नंबर काढता आणि दागिन्यावर हि प्रिंट करता आणि त्यांच्या पोर्टल ला हि अपलोड करता.

तर मित्रांनो अशी हि HUID ची संकल्पना आहे आणि यामुळे सोनार हे चिंतेत का आहेत? कारण बघा का सरकारने सोनारांना म्हटले आहे की, 2 ग्राम पेक्षा वरील दागिने असतील तर त्यात तुम्ही काही बदल करू शकत नाही.

उदाहरणार्थ आपण बघू कि समजा कोणी ग्राहक बांगळ्या खरेदी करायला गेला आणि  ग्राहकाची गरज फक्त एक बांगळीची असेल, मग आधी जेव्हा HUID ची संकल्पना नाही होती तेव्हा अनेकवेळा सोनार एक बांगळी देऊ शकत होते पण आता HUID ची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर, त्याने गुंतवणूक केलेल्या स्टॉक तसाच राहील कारण HUID झालेल्या दागिन्यांची हॉलमार्क सेंटर द्वारे त्याच्या पोर्टल ला नोंद झालेली असते म्हणून त्यांना जुन्या स्टॉक मधून एक बांगळी देता येणार नाही त्यांना डायरेक्ट नवीन ऑर्डर द्यावी लागते. आणि नवीन ऑर्डर घेतल्यानंतर हि आता पहिल्यासारख राहील नाही कि ऑर्डर दिली असल्यावर 7 ते 8 दिवसांमध्ये दागिने तयार होऊन जातील आता आणखी 7 ते 8 दिवस HUID करण्याची प्रक्रिया करण्यासाठी वाढून जातात.

या कारणांमुळे सोन्याचे दागिन्यांची विक्री करने हे आता थोड सोनारांना डोके दुखी निर्माण करत आहे. कारण कोणताही ग्राहक 15, 15 दिवस प्रतीक्षा करू शकत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला सोनारांची समस्या समजली असेल.

आता यामुळे ग्राहकांवर काय प्रभाव पडणार आहे ते एका उदाहरण द्वारे समजून घेऊया, समजा कि तुमच्या कडे उद्या काही कार्यक्रम आहे आणि त्यासाठी तुम्हाला अंगठी खरेदी करायची आहे आणि सोनाराकडे तुम्हाला जी डिझाईन आवडते आहे त्याची साईज हि मिळायला हवी कारण प्रतेकाचा बोटांचा माप हा वेगवेगळा असतो आणि सोनारांकडे एक कॉमन साईझ मधेच दागिने असता तर इथे हि कमी चान्सेस असता कि आपल्या बोटाला अंगठी योग्य मापाची मिळेल मग अश्या परिस्थितीत सोनार आधी त्या अंगठी ला कट करून डाग लाऊन आपल्या मापाची करू शकत होते पण आता HUID ची संकल्पना आल्या पासून ते नाही करू शकत कारण सरकारने त्यांना स्पष्ट पणे सांगितले आहे कि तुम्ही 2 ग्राम वरील दागिन्याम्ध्ये काही फेरबदल नाही करू शकत.

मग सोनारांकडे एकच पर्याय उरतो तो म्हणजे नवीन ऑर्डर घेऊन ग्राहकाच्या बोटाचा माप घेऊन नवीन अंगठी बनवावी लागेल आणि मी वरती सांगितल्या प्रमाणे जर 15, ते 20 दिवस जर लागत असतील अंगठी बनून यायला तर कसकाय शक्य आहे कारण तुमच्या कडे कार्यक्रम तर उद्याच आहे.

https://goldmahiti.com/

मग तुमच्या कडे हि एकच पर्याय उरतो तो म्हणजे तुम्हाला दुसर्या डिझाईन मध्ये जी अंगठी तुमच्या बोटात फिट होईल तीच तुम्हाला घ्यावी लागेल भलेच तुम्हाला आधी पाहिलेली डिझाईन जास्त आवडली असेल मग तुम्हाला हि डिझाईन च्या संदर्भात तडजोड करावी लागणार आहे.

तर मित्रांनो हि होती HUID बद्दल अतिशय महत्वाची माहिती जर आपणार हि माहिती खरच महत्वाची वाटली असल्यास आपल्या परिवारात व मित्रांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद. 

Share to your friends

Leave a Comment