गुंतवणूक साठी सोने कधी व कसे खरेदी करायला हवे जाणून घ्या येथे.

नमस्कार मित्रांनो आज आपण बात करनार आहोत कि सोने गुंतवणूक साठी कधी व कसे खरेदी करायला हवे.

जस कि मी आपल्या ह्या साईट वर सोने व चांदी शी सम्बन्धित संपूर्ण महत्वाची माहिती आणत असतो तर मला काही लोक अस विचारता कि सर आम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची आहे तर त्या बद्दल हि काही माहिती द्या तर त्या साठी हि पोस्ट आहे.

तर मित्रांनो जेव्हा आपण सोने खरेदी करण्याबद्दल बोलतो तेव्हा आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सोन्याची किंमत, परंतु आपण सोन्याच्या किमतीची काळजी अशा प्रकारे हि घेऊ नये की आपण गुंतवणूकीच्या उद्देशाने सोने खरेदी करतोय एक महिना आपण  खरेदीगोल्ड केल नाही आणि दुसर्या महिन्यात गोल्ड चा भाव हा वाढून गेला  सांगण्याचा उद्देश एकच कि आपण सरासरी आपल्या क्षमता नुसार अर्धा ग्राम किंवा 1 ग्राम किंवा जास्त वजनाचे सोन्याचे तुकडे प्रतेक महिन्याला घ्यायला पाहिजे.

goldmahiti.com

आता बघा एका महिन्यात काय सोन्याचे भाव एकदमच वाढतील किंवा कमी होतील अस काही होत नाही जो पर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर काही मोठे घटना घडते.

आणि एक असही आहे कि आपल्या देशात कामगार लोकांची संख्या हि खूप जास्त प्रमाणात आहे आणि कामगार लोकांचा पगार हा 1 ते 5 तारखेपर्यंत होत असतो मग त्यांचा व्यवहार हा महिन्याच्या सुरुवातीचे दिवसांत होत असतो तर अस बघण्यात आल आहे कि सोन्याचे भाव हे देशांत होणारे जे व्यवहार आहेत त्यांचे हि काही प्रमाणात सोन्याचे भावांवर प्रभाव पडत असतो.

तर मग अस पाहण्यात येत कि महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांत सोन्याचे भाव हे वाढलेले असून महिन्याच्या शेवटच्या दिवसांत भाव हे कमी दिसून येता.आता हे दर वेळी असच होईल अस नाही आहे पण काही वेळेस होत असत.

gold rate today | आजचा सोन्याचा भाव

जस कि आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड स्कीम होती की सोने खरेदी करताना जर क्रेडिट कार्ड ने पेमेंट केली तर काही टक्के डिस्काऊंट मिळेलकाही वेळेस Amazon, flipkart वर कोणतीही स्पेशल ऑफर असते तेव्हा आपण तेथून सोन्याचा कॉईन खरेदी करू शकतो कारण तेथे काही वेळेस कार्ड ने पेमेंट केल्यावर आपल्याला बराच discount मिळत असतो म्हणून आपण तेथे हि ऑफर्स चेक करत राहायला पाहिजे ज्याने करून आपला फायदा होईल.

आणि एक महत्वाची गोष्ट मी येथे तुम्हाला सांगू इच्छितो कि आपण जेव्हाही सोनाराकडे सोने घ्यायला जातो तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी कि जर आपण सोने गुंतवणूक साठी खरेदी करत आहोत तर तो आपण अखंड स्वरूपातच म्हणजे 24 कॅरेट  खरेदी करायला हवे नाकी 22, 20,18 कॅरेट चे दागिने सोनार लोक आपल्याला कितीही सांगतील कि तुम्हाला हे दागिने घेतल्यावर मोड्तांना डागची घट येणार नाही तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि त्या दागिन्यांना घट जरी नसली तरी त्यांची जी मेकिंग चार्जेस (मजुरी) असते ती खूप जास्त असते म्हणजे दागिन्यांची मोड करताना आपल्याला जी डागची घट लागणार असते ती घट ते आधीच मेकिंग चार्जेस मध्ये आपल्याकडून काढून घेता कारण सोन्याची मोड करताना आपल्याला फक्त सोन्याचा दराच्या हिशोबानेच पैशे मिळतात खरेदी करताना वरील दिलेले सगळे चार्जेस जसे कि मजुरी, GST आणि इतर ते परत मिळत नाही.

gold price today

म्हणून आपण गुंतवणुकी साठी 24 कॅरेट असलेला सोन्याचा तुकडा किंवा त्यापासून बनवलेले सादे दागिने जरी त्यात आपल्याला जास्त डिझाईन नाही भेटली तरी चालेल कारण त्याला मेकिंग चार्जेस कमी असता आणि मोड करताना आपल्याला चांगला परतावा मिळतो दागिन्यांच्या तुलनेने ज्याने करून आपल्याला जास्त नुकसान होत नाही.

तर मित्रांनो हीच ती महत्वाची माहिती जी आपल्याला माहित असायला हवी ज्याने करून सोन्याचा व्यवहार करताना आपल्याला जास्त नुकसान नको व्हायला जर आपल्याला हि माहिती महत्वाची वाटली असेल तर आपल्या परिवारात व मित्रांसोबत नक्की share करा धन्यवाद.

 

हे पण वाचा:

आता EMI ने सोने खरेदी करा 2000 इंस्टालमेंट | buy gold on EMI installment.
सोने खरेदी करणार्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती | हॉलमार्क दागिन्यांचे प्रकार.
काय आहे HUID सरकारचा नवीन नियम जाणून घ्या इथे.
जुने सोने ची मोड करतांना आणि बदलतांना किती घट कापता सोनार जाणून घ्या इथे.
जुने सोन्याची मोड करून नवे सोने घेनार्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती.

 

Share to your friends

Leave a Comment