जुने सोने ची मोड करतांना आणि बदलतांना किती घट कापता सोनार जाणून घ्या इथे.

नमस्कार मित्रांनो, आपण जेव्हाही सोनाराच्या दुकानावर जातो नवे सोने खरेदी करायला तेव्हा आपल्या मनात एक विचार नक्कीच येतो आणि तो म्हणजे आपले जुने सोने बदलून नवे सोने घेऊ,  मग आपल्या मनात एक प्रश्न येतो की जर आपण आपले जुने सोन्याचे दागिने बदलून घेतले तर सोनार आपल्याकडून किती रक्कम कापून घेतील? तर आजच्या ह्या पोस्टमध्ये मी तुम्हाला हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.

 

मित्रांनो जेव्हाही तुम्ही तुमचे जुने सोन्याचे दागिने बदलायला जाता तेव्हा तुमच्या मनात एक भ्रम हा नक्कीच असतो कि सोनार लोक आपले सोन्याची मोड ची रक्कम मधून काही पैसे ते कापून घेता तर हे तुम्ही विसरून जा मित्रांनो कि ते पैसे कापून घेता बघा, पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण सोने खरेदी करायला जातो, तेव्हा आपण ते कॅरेटने खरेदी करत असतो जसे की 22 कॅरेट, 18 कॅरेट किंवा  23 कॅरेट काही ठिकाणी 23 कॅरेट चे हि दागिने विकले जातात पण त्यात शुद्धता हि 20 किंवा 18 कॅरेट वालीच असते पण ते मी पुढच्या पोस्ट मध्ये कवर करणार आहे. मित्रांनो, जेव्हा आपण हे दागिने विकत घेतो, त्यानंतर आपण त्याचा वापर करतो आणि जेव्हा आपले दागिने वापरण्यात तुटतात किंवा तेव्हा आपण दागिन्यांची बदली करायला सोनारांकडे जातो.

तर जेव्हा आपण सोनारांकडे जातो तेव्हा आपल्याला हे माहित नसत कि हे किती कॅरेट च आहे काय आहे, किंवा याची शुद्धता काय आहे? आपल्याला फक्त एवढच माहित असत कि आपल्या सोन्याच वजन किती आहे बस. तर होत काय मित्रांनो समजून चला तुमच्या दागिन्याचे वजन 10 ग्राम आहे आणि तुम्ही सोनाराला म्हणता कि हे आमचे 10 ग्राम चे सोने आम्हाला मोडून नवीन सोने घ्यायचे आहे, मग सोनार म्हणतात कि ठीक आहे तुमचे सोने 10 ग्राम तर आहे पण त्यातून 15 टक्के डाग ची घट म्हणून वजा होईल.

म्हणजे मित्रांनो त्या सोनाराचा सांगण्याचा अर्थ असा असतो कि तुमचे जे सोने आहे त्याची शुद्धता आहे 85 टक्के म्हणजेच तुमचे जे 10 ग्राम सोने आहे त्यात 85 टक्के पिव्वर सोने आहे त्याचेच तो पैसे देतो आणि उरलेले 15 टक्के हे त्यात मिश्र धातू असतात तर ते तो वजा करतो, तर मित्रांनो इथे काही लोकांना गैरसमज होतो कि आपल्या सोन्याची जे आहे जास्त पैसे होत आहेत पण ते पैसे कापून आपल्याला देता आहेत.

आता उदाहरण म्हणून एक गोष्ट समजून घेऊया की जर आपण 22 कॅरेट हॉलमार्क असलेले दागिने विकत घेतले, तर तुम्ही खरेदी केलेल्या 22 कॅरेट हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता किती असते तर ती असते 91.60% म्हणजेच 92टक्के तुम्ही गृहीत धरु शकता.

आता तुमच्या कडे आहे 10 ग्राम हॉलमार्क चे सोने मग आता 10 ग्राम सोने मध्ये किती पिव्वर सोने आहे तर ते आहे 9 ग्राम आणि 200 मिलीग्राम म्हणजेच 9.200  मिलीग्राम बाकी त्यात उरलेले जे आहे ते इतर मिश्र धातू असतात. तर जो सोनार आहे तो तुम्हाला 9.200  मिलीग्राम चेच पैसे देईल म्हणजे याचा अर्थ असा नाही कि त्याने 8 टक्के पैसे कापून घेतले याचा अर्थ एकदम असा होत नाही.

याचा अर्थ असा आहे कि तो सोनार तुम्हाला तुमच्या वस्तू मध्ये जेवढे पिव्वर सोने आहे त्याचेच तो पैसे देतो. मला आशा आहे मित्रांनो कि तुम्हाला हि माहिती महत्वाची वाटली असेल जर वाटली असेल तर तुमच्या परिवारात व मित्रांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद.

gold price today
gold price today

मेले यांना अशा महत्त्वाच्या संपर्क माध्यमाद्वारे तुमच्या लोकांपर्यंत पोहोचायचे नाही. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि विचारा, ना बोले आज केले बसित नाही धन्यवाद.

सोने चांदीशी सम्बन्धित सर्व महत्वाची माहिती आम्ही या साईट वर टाकत असतो तर आपणास काही माहिती हवी असल्यास कमेंट बोक्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

हे पण वाचा:

आता EMI ने सोने खरेदी करा 2000 इंस्टालमेंट | buy gold on EMI installment.
सोने खरेदी करणार्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती | हॉलमार्क दागिन्यांचे प्रकार.
काय आहे HUID सरकारचा नवीन नियम जाणून घ्या इथे.
चांदी काळी पडण्याचे कारण व तिला स्वछ करण्याचे उपाय. 
जुने सोन्याची मोड करून नवे सोने घेनार्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती.
Share to your friends

Leave a Comment