जुने सोने ची मोड करतांना आणि बदलतांना किती घट कापता सोनार जाणून घ्या इथे.

मित्रांनो जेव्हाही आपण सोने खरेदी करायला जातो तेव्हा आपल्या मनात एक प्रश्न येतो की जर आपण आपले जुने सोन्याचे दागिने बदलून घेतले तर सोनार आपल्याकडून किती रक्कम कापून घेतील? 

सोन्याची मोड करतांना तुमच्या मनात एक भ्रम हा नक्कीच असतो कि सोनार लोक आपले सोन्याची मोड ची रक्कम मधून काही पैसे ते कापून घेता 

मित्रांनो जेव्हा आपण सोने खरेदी करायला जातो, तेव्हा आपण ते कॅरेटने खरेदी करत असतो जसे की 22 कॅरेट, 18 कॅरेट किंवा अजून इतर कॅरेट  असतात.

जेव्हा आपण हे दागिने विकत घेतो, त्यानंतर आपण त्याचा वापर करतो आणि जेव्हा आपले दागिने वापरण्यात तुटतात तेव्हा आपण दागिन्यांची बदली करायला सोनारांकडे जातो. 

मग होत काय मित्रांनो आता उदाहरण म्हणून एक गोष्ट समजून घेऊया की जर आपण 22 कॅरेट हॉलमार्क असलेले दागिने विकत घेतले, त्यांची शुद्धता किती असते तर ती असते 91.60% म्हणजेच 92टक्के तुम्ही गृहीत धरु शकता. 

समजा तुमच्या कडे आहे 10 ग्राम हॉलमार्क चे सोने मग आता 10 ग्राम सोने मध्ये किती पिव्वर सोने आहे तर ते आहे 9 ग्राम आणि 200 मिलीग्राम म्हणजेच 9.200  मिलीग्राम बाकी त्यात उरलेले जे आहे ते इतर मिश्र धातू असतात. 

तर जो सोनार आहे तो तुम्हाला 9.200  मिलीग्राम चेच पैसे देईल म्हणजे याचा अर्थ असा नाही कि त्याने 8 टक्के पैसे कापून घेतले याचा अर्थ एकदम असा होत नाही.

याचा अर्थ असा आहे कि तो सोनार तुम्हाला तुमच्या वस्तू मध्ये जेवढे पिव्वर सोने आहे त्याचेच तो पैसे देतो. तर मित्रांनो माहिती महत्वाची वाटली असेल तर तुमच्या परिवारात व मित्रांसोबत नक्की शेअर करा व सोने शी सम्बन्धित अशी महत्वाची सर्व माहिती साठी नक्की भेट द्या आपली साईट goldmahiti.com ला.