तुमच्या सोन्याच्या दागिन्यांची देवाणघेवाण करून नवीन सोन्याचे दागिने मिळवायचे असतील किंवा तुम्ही नुकतेच सोन्याचे दागिने बदलले असतील. जर तुम्हाला सोन्याचे दागिने किंवा इतर काही नुकसान करून घ्यायचे नसेल तर बनून रहा आमच्यासोबत.

जेव्हाही आपण सोन्याचे दागिने खरेदी करतो, तेव्हा त्यातील 80 टक्के भारतीय लोक अशे आहेत जे आपले जुने सोन्याचे दागिने बदलून म्हणजे त्याची मोड करून नवे दागिने घेतात  

 पण मित्रांनो, जर आपण दागिने विकत घेतले तर सोन्याचे दागिने कसे खरेदी करायचे? कृत्रिम दागिने वापरात येत असले, तरी सोने हा एक प्रकारचा गुंतवणूक आहे, असे आपल्याला वाटते.  

एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी जेव्हा हि आपण जुने दागिने मोड करून नवे दागिने खरेदी करत असतो तेव्हा आपण कसा व्यवहार करायला हवा किंवा हा व्यवहार होतो कसा हे आपण लक्षात घ्यायला हवे कारण काही वेळेस ग्राहकास व्यवहार समजत नाही तर मोठे नुकसान होते 

जुने दागिने मोड करणे यामध्ये तुमच्या लोकांचे एक नुकसान आहे कि ते दागिने खरेदी करताना आपण दिलेले मेकिंग चार्जेस आणि gst चार्जेस हे परत मिळत नाहीत सहसा करून लहान दागिने असल्यावर कमी पण मोठे दागिने जेव्हा हि आपण मोड करतो त्या वेळेस आपले खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते .  

या व्यतिरिक्त आपण जे नवीन दागिने घेतो त्यांनाही आपल्याला नवीन मेकिंग चार्जेस आणि gst चार्जेस हे द्यावे लागता आणि मित्रांनो हे मेकिंग चार्जेस आताच्या काळात खूप जास्त असता टक्केवारी नुसार आता हे चार्जेस घेतले जातात एका ग्राम च्या मागे 800 ते 1000 रु पर्यंत असता प्रत्येक सोनाराकडे  वेगवेगळे असता.

त्शिायवाय, सर्वात मोठी गोष्ट जी मी इथे सांगणार आहे ती म्हणजे मित्रांनो, पूर्वी जेव्हा मी याबद्दल बोलायचो, तेव्हा जास्तीत जास्त कोणताही ज्वेलर तुम्हाला बिल नक्की देत असे पण  जर तुम्ही काही वस्तू बनवून ठेवली असेल जी आतापासून दहा वर्षे जुनी आहे, तर त्याचा कोणताही ट्रॅक रेकॉर्ड नाही.  

पण आज जर तुम्हाला सोन्याचे दागिने विकून नवीन सोन्याचे दागिने घ्यायचे असतील, तर आज तुम्हाला असलेल्या दागिन्यांसह ज्वेलरला आधार कार्ड द्यावे लागेल, आणि तुम्ही खरेदी करत असणारे दागिने जर हॉलमार्क केलेले असतील तर हॉलमार्क सहित त्या दागिन्यांवर HUID कोड हा प्रिंट असेल 

म्हणजे ज्याने करून आपण खरेदी केलेले प्रतेक दागिन्यांचा रेकॉर्ड हा वरती रेकॉर्ड होत असतो म्हणून आता दागिने खरेदी करताना gst चे बिल घेने हि अनिवार्य केले गेले आहे. म्हणून काही वेळेस सोनार जर त्याच्या फायद्या साठी काही वेळेस gst बिल नाकारत असेल तर आपण आग्रह करून gst बिलच घ्यायला हवे. 

मित्रांनो दागिने खरेदी करताना बिल हे किती महत्वाचे असते ह्या बद्दल एक पूर्ण माहिती सह एक पोस्ट आपल्या साईट वर उपलब्ध आहे तर आपण ती माहिती घेऊ शकता खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून.

मित्रांनो सोने चांदीशी सबंधित सगळी महत्वाची  माहिती आपल्या साईट वर असते म्हणून आपण एकदा खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून अवश्य भेट देणे आवश्यक आहे ज्याने करून आपले आपल्या परिवाराचे सोने खरेदी करताना किंवा मोड करताना नुकसान व्हायला नको.