22k सोन्याचे दागिने काळे का पडतात?

  • नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो आपली साईट goldmahiti.com वर, मित्रांनो बरेच लोक मला हा प्रश्न विचारतात जेव्हा आपण 22 कॅरेट सोन्याचे दागिने वापरतो तेव्हा काही दिवसांनी ते सोने काळे होते मग असे का होते आजच्या पोस्ट मध्ये आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू.

 

  • तर मित्रांनो आपणास कदाचित माहितच असेल कि जेव्हा 22 कॅरेट सोन्याचे दागिने बनवले जातात तेव्हा त्यात 91.60 टक्के शुद्ध सोने असते आणि उरलेले 8.4 हे टक्के चांदी, तांबे किंवा इतर अनेक मिश्र धातु असतात.

  • तर काय मित्रांनो हे मिश्र धातू जर सोनार किंवा जे कारागीर असता दागिने घडवणारे त्यांनी जर हे मिश्र धातू चांगल्या काॅलिटी चे नाही वापरले तर वेळेसोबात ते दागिने जे आहेत ते काळे व्हायला सुरुवात होते. मग त्यावर अनेक गोष्टींचा प्रभाव पडतो, जसे की रोजच्या वापरात आपण वापर करतो किंवा कधी कधी वापर करतो, बरेच दागिने असे असतात की आपण ते एकदाच घालतो, घातल्यानंतर आपण ते काढतो आणि स्वच्छ नाही करत ते तसेच लॉकरमध्ये ठेवतो. लॉकरमध्ये ठेवल्यानंतर दागिने त्यांवर आपल्या शरीराचा घाम किंवा अजून कारण असता त्याने हि ते काळे पडता.

 

  • असे नाही मित्रांनो कि सोन्याचे 22 कॅरेट सोन्याचे दागिने नेहमी काळे पडतात. त्यामागील कारण एक तर हे असू शकते की त्या मध्ये जे मिश्र धातू आहेत ते हलक्या काॅलिटी चे वापरले असतील. जसे की अनेक सोनार जे तुम्हाला कमी मेकिंग चार्जेस घेऊन 22 कॅरेटचे दागिने देतात तेव्हा हे होण्याची शक्यता आहे.

  • त्यानंतर जेव्हा जेव्हा आपल्याला हे टाळायचे असेल तर एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल. जेंव्हा आपण दागिने काढून लॉकर वगैरेमध्ये ठेवतो, तेंव्हा ते स्वच्छ करून ठेवायला हवे ज्याने करून की ते सोने काळे होणार नाही.

 

  • तर मित्रांनो हि माहिती महत्वाची वाटल्यास आपल्या परिवारात व मित्रपरिवारात नक्की शेअर करा धन्यवाद.
Share to your friends

Leave a Comment